Pan Card News : भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन कागदपत्रे अतिशय महत्त्वाची बनली आहेत. या दोन्ही कागदपत्रांविना कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही. भारतात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरीदेखील आधार कार्ड लागते. यावरून आधार कार्डची उपयोगिता आपल्याला लक्षात येते.
याशिवाय पॅन कार्डचा देखील आधार कार्ड प्रमाणे वापर होतो. पॅन कार्ड हे एक प्रमुख शासकीय कागदपत्रे असून याचा वापर वित्तीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वित्तीय कामकाज पॅन कार्ड विना पूर्णच होऊ शकत नाही.
बँकेत खाते खोलण्यापासून ते आयकर भरण्यापर्यंत सर्वत्र पॅन कार्डचा वापर केला जातो. ही पैशांची कामे पॅन कार्ड शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे पॅन कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनते. मात्र पॅन कार्डचा वापर करतांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
अन्यथा पॅन कार्ड धारकांना मोठा दंड भरावा लागू शकतो. दरम्यान आज आपण पॅन कार्ड वापरताना पॅन कार्ड धारकांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पॅन कार्ड वापरताना कोण-कोणती काळजी घ्यावी
Pan Card हे वित्तीय कामांमध्ये वापरले जात असल्याने याचा वापर करताना विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कर दात्याने पॅन क्रमांकाचा योग्य वापर केला नाही तर त्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
त्याने जर चुकीचा पॅन क्रमांक टाकला तर त्याला दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. पॅन क्रमांकाविषयीचे आयकर विभागाचे नियम खूप कडक आहेत. विशेषत: आयकर विवरणपत्र भरताना अचूक पॅन क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
अन्यथा दंड भरावा लागू शकतो. यामुळे जे आयकर भरत असतील अशा व्यक्तींनी आयकर विवरण पत्र भरताना त्यांचा पॅन कार्ड नंबर काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना दहा हजार रुपयांचा दंड नाहक भरावा लागू शकतो.
याशिवाय पॅन कार्ड चोरी झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक असते. कारण की पॅन कार्ड हे वित्तीय कामकाजाशी संबंधित असते. जर तुमचे कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास फसवणूक अथवा घोटाळ्यासाठी वापर होऊ शकतो.
यामुळे पॅन कार्ड हरवले की ताबडतोब पोलिसात तक्रार नोंदवायला हवी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच, एकापेक्षा अधिक पॅन कार्ड बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे.
यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे दोन कार्ड असतील तर एक कार्ड तत्काळ आयकर विभागात सरेंडर करावे असे आव्हान करण्यात आले आहे. नाहीतर आयकर विभाग अशा दोन कार्ड बाळगणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करू शकते.