Pan Card News : भारतात अलीकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. भारतात या दोन्ही कागदपत्रांशिवाय कोणतेच शासकीय आणि निमशासकीय काम होऊ शकत नाही. आधार कार्ड विना आपल्या देशात साधे एक सिम कार्ड देखील बनवले जाऊ शकत नाही.
दुसरीकडे पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर हे कार्ड प्रत्येक वित्तीय कामांसाठी आवश्यक असते. शासकीय तसेच निमशासकीय कामांमध्ये पॅन कार्डचा वापर केला जातो. भारतीय आयकर विभागाकडून हे कार्ड दिले जाते आणि एका व्यक्तीचे एकच पॅन कार्ड तयार होत असते.
वित्तीय कामकाजाशी संबंधित असलेले हे कार्ड वापरतांना सर्वसामान्यांना काही काळजी मात्र घ्यावी लागते. बँक खाते उघडणे, केवायसी करणे, आयकर विवरण भरणे, स्कॉलरशिप फॉर्म सबमिट करणे अशा विविध आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
मात्र पॅन कार्डचे नियम खूप कठोर आहेत. या कागदपत्राचा थेट पैशांशी संबंध असल्याने याचे नियम देखील तेवढेच कठोर बनवले गेले आहेत. या नियमानुसार जर एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते.
खरे तर असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे चुकून दोन पॅन कार्ड आले आहेत. जर तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण की, तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, दोन पॅन कार्ड असणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. तसेच, जर एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील आणि त्याने याबाबतची माहिती लपवली असेल तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो.
आयकर कायदा 1961 च्या कलम 272B नुसार, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास, तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. पण तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असल्यास, तुम्ही त्यामधील एक पॅन कार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करू शकता.
अतिरिक्त पॅनकार्ड सरेंडर करण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे आयकर विभागाशी संपर्क साधू शकता. ऑनलाइन सरेंडरसाठी, तुम्हाला विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि नंतर Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data पर्यायावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तो काळजीपूर्वक भरावा लागेल आणि नंतर दोन्ही पॅन कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांसह NSDL कार्यालयात जावे लागेल. फॉर्म सबमिट करण्यासोबत, तुम्हाला बॉण्ड देखील भरावा लागेल. यासाठी तुम्हाला शंभर रुपयाचा खर्च येऊ शकतो.
पण जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील आणि तुम्ही त्यामधील एक पॅन कार्ड सरेंडर केले नाही आणि विभागाच्या कायदेशीर कारवाईत तुमच्याकडे दोन पॅन कार्ड आढळून आलेत तर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत जेल किंवा मग दहा हजारापर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.