Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रसहित देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
त्यावेळी काही भागांमध्ये गारपीट देखील झाली आणि यामुळे फळ पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली होती.
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात, डिसेंबर महिन्याची सुरुवात आणि जानेवारी 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने झाली असल्याने आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पाऊस पडणार का ? हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती दिली आहे.
कस राहणार हवामान ?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसा अंशता ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते.
मात्र अवकाळी पाऊस कुठेचं पडणार नाही आणि मध्यरात्री थंडीचा जोर कायम राहील असे पंजाबरावांनी म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आणि विदर्भातही 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विभागातही दिवसा अंशता ढगाळ हवामान कायम राहील आणि रात्री थंडीचा जोर पाहायला मिळू शकतो.