Panjab Dakh Maharashtra : यंदा मान्सूनने आपल्या लहरीपणाच्या जोरावर भारतीय हवामान विभागाच्या आणि पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाला चकवा दिला आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीपासूनच कुणाचेच अंदाज तंतोतंत खरे ठरत नव्हते. पंजाब डख यांचे अंदाज मात्र यावर्षी खूपच चुकलेत अशी शेतकऱ्यांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती.
पण पंजाब डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज व्यक्त केला. यामध्ये त्यांनी मान्सूनचे आगमन 8 जूनला झाले मात्र चक्रीवादळामुळे मानसून कमकुवत झाल्याचे स्पष्ट केले. तसेच मानसून 22 जूनला स्थिर होणार, 23 जूनपासून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आणि 24 जून पासून राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असे भाकीत त्यांनी वर्तवले.
हा पंजाब डख यांचा अंदाज मात्र तंतोतंत खरा ठरला. 23 जूनला राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते तर काही ठिकाणी पाऊसही झाला. 24 जूनला राज्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे आता 25 जून पासून पुढे महाराष्ट्रात कसे हवामान राहणार, पावसाचा जोर कायम राहणार का, कोणत्या भागात पाऊस पडणार, असे प्रश्न शेतकरी बांधव विचारात आहेत.
एकंदरीत शेतकऱ्यांना आता डख यांचा पुढील हवामान अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत आज आपण 25 जून पासून पुढे राज्यातील हवामान कसे राहणार? याबाबत डख यांनी काय अंदाज व्यक्त केला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 25 जून पासून ते दोन जुलै पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी असा पाऊस पडेल की नदी-नाले दुतर्फा ओसांडून वाहतील असं भाकीत त्यांनी वर्तवल आहे.
सोबतच जून अखेरपर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस होणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. या कालावधीमध्ये म्हणजेच 25 जून ते दोन जुलै पर्यंत राज्यातील विदर्भ विभागातील पूर्व आणि पश्चिम भागात अर्थातच पूर्व विदर्भ म्हणजेच नागपूर विभागात आणि पश्चिम विदर्भ म्हणजेच अमरावती विभागात जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्र अर्थातच नंदुरबार, धुळे, जळगाव या खानदेशातील तीन जिल्ह्यात आणि नासिक तसेच अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय मराठवाडा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागात देखील मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच राजधानी मुंबईसह कोकणात देखील मुसळधार पाऊस होणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच राज्यातील सर्वच विभागातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण 25 जून पासून ते दोन जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.