Panjab Dakh News : भारतीय हवामान विभागाकडून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांशी भागात मौसमी पावसाचा जोर खूपच कमी आहे. यामुळे बळीराजा आषाढी एकादशी आली तरी देखील जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील तेरा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विशेष बाब म्हणजे आगामी काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांची एक जुनी क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये पंजाब डख महाराष्ट्रात गारपीट होणार अशी माहिती देत आहेत. मात्र ही ऑडिओ क्लिप जुनी आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमअवस्था पसरली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये पंजाब डख छत्रपती संभाजी नगर, जळगाव आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करत आहेत. या ऑडिओ क्लिप मध्ये डख यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 27 आणि 28 तारखेला राज्यात मुसळधार पाऊस होणार आणि काही भागात गारपीट होणार अशा आशयाची ही क्लिप आहे.
मात्र कोणत्या महिन्यातील 27 आणि 28 तारखेला पाऊस होणार याबाबत या क्लिपमध्ये कोणतीच माहिती नाही. अशा स्थितीत ही ऑडिओ क्लिप जुनी असल्याचे स्पष्ट होत आहे. खरंतर, पंजाब डख हे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. अशा स्थितीत या जुन्या क्लिपमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी या जुन्या क्लिप वर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे. दरम्यान पंजाब डख यांनी आगामी काही दिवस राज्यात कस हवामान राहणार याबाबत नेमकी काय माहिती दिली आहे, पंजाबरावांनी वर्तवलेला खरा हवामान अंदाज काय आहे याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत.
काय म्हणताय पंजाब डख
पंजाब डख यांनी 22 जून 2023 रोजी अर्थातच आठ दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार राज्यात 23 जून पासून पावसाला सुरुवात होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे डख यांनी व्यक्त केलेला हा अंदाज खरा ठरला आहे. 23 जून पासून राज्यात भाग बदलत पाऊस पडत आहे.
अशा स्थितीत आता पुढे हवामान कस राहणार? याविषयी शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की डख यांनी तीन जुलै पर्यंत एक दिवसआड महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
मराठवाड्यात देखील पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे पंजाब डख यांची गारपीट होणार अशा आशयाची व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप जुनी असून या ऑडिओ क्लिप वर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले जात आहे.