Panjab Dakh Weather Update : मान्सून 2023 मध्ये खूपच कमी पाऊस झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात यंदा सरासरीपेक्षा जवळपास 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली. यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळाली आहे.
परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
याशिवाय द्राक्ष सारख्या फळबागांना देखील याचा फटका बसला आहे. या चालू महिन्यातही राज्यात अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे.
त्यामुळे शेती पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला असून रब्बी हंगामातील हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात मर रोग पाहायला मिळत आहे.
यामुळे पीक पेरणीसाठी आलेला शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागू शकते असा अंदाज आहे.
अशातच आता जस्ट हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आता 9 डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे. तसेच हळूहळू थंडीचा चोर वाढेल असा अंदाज त्यांनी दिला आहे. यंदा मार्च महिन्यापर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय त्यांनी डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक पाऊस पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावणारा असा अंदाज त्यांनी दिला आहे.
एवढेच नाही तर नववर्षाच्या सुरुवातीला अर्थातच जानेवारी महिन्यातही एक पाऊस पडेल असा अंदाज आहे. एकंदरीत आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान आता प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज आहे.
तर काही ठिकाणी अंशता ढगाळ हवामान राहील आणि हळूहळू थंडीचा जोर वाढेल असे बोलले जात आहे. तसेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे.