Panjab Dakh : अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा म्हणून महाराष्ट्रात मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला. अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे खराब झालेत.
गहू समवेतच हरभरा या मुख्य पिकाला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तर हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मात्र अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. हवामान खात्याने तर आता राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज देखील दिला आहे.
पुढील काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि आकाश निरभ्र राहील असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची देखील शक्यता आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यातील हवामानाबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे. आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार की नाही यासंदर्भात पंजाबरावांनी महत्वाची माहिती दिली आहे.
खरे तर पंजाबरावांनी आधीच्या आपल्या हवामान अंदाजात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
25 फेब्रुवारीपासून राज्यात अहो काही पावसाला सुरुवात होणार आणि मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असे सांगितले आहे.
मात्र अलीकडेच अर्थातच नुकत्याच एक ते दोन दिवसांपूर्वी वर्तवलेल्या हवामान अंदाजात त्यांनी जानेवारी महिन्यातील हवामानासंदर्भात अपडेट दिलेली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवस म्हणजेच 27 जानेवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच या कालावधीत अवकाळी पाऊस बरसणार नाही.
परंतु 15, 16 आणि 17 जानेवारीला राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु अवकाळी पाऊस बरसणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.