Panjabrao Dakh August 2023 Havaman : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती पंजाबराव डख यांच्या माध्यमातून. जस की आपण पाहताय राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर खूपच वाढला आहे.
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता खूप वाढली असून राज्यातील काही भागात पूरस्थिती तयार होत आहे. कोकणातील बहुतांशी नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच आगामी काही तासात कोकणात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे.
यासोबतच गेल्या काही तासात विदर्भात झालेल्या पावसामुळे तेथील चाळीस गावांचा संपर्क तुटला असल्याची बातमी समोर आली आहे. निश्चितच, गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरतर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली. विशेषता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातुन पाऊस गायब झाला होता. पावसाळ्यातच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून या आधीचा बॅकलॉक आता पाऊस भरून काढेल असे चित्र तयार होत आहे. अशातच पंजाबराव डख यांनी देखील काल आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वर एक हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 आणि 20 जुलै रोजी ओढे नाले भरून वाहतील एवढा पाऊस पडणार आहे. तसेच 19 जुलै पासून 30 जुलै पर्यंत राज्यात दर एका दिवसाआड पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
यात आज आणि उद्या राज्यात वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
यानंतर पुन्हा एकदा 28 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावं डख यांनी व्यक्त केला असून यंदा दुष्काळ पडणार नाही, समाधानकारक मान्सून राहील असं पुन्हा एकदा अधोरेखित केल आहे.