Panjabrao Dakh Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र दुष्काळाचे उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली. यामुळे दुष्काळाचे उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. यानंतर सात तारखेपासून पावसाचा जोर वाढला. परंतु 11 सप्टेंबर नंतर राज्यातून पावसाने पुन्हा एकदा काढता पाय घेतला. याचा परिणाम म्हणून ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिना देखील कोरडा जाणार असे शेतकऱ्यांना वाटू लागले.
मात्र, गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि परिस्थिती पुन्हा एकदा बदलली. राज्यात 19 सप्टेंबर पासून अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण गणेशोत्सव मुसळधार पावसाने गजबजून उठला. गणरायाच्या आगमना बरोबर दाखल झालेला मुसळधार पाऊस अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच गणपती विसर्जनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मनसोक्त बरसला.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील दुष्काळाचे मलभ काहीसे कमी झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यात एक ऑक्टोबर पर्यंत काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशातच ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाचा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या अर्थातच 30 सप्टेंबर अन उद्या एक ऑक्टोबर रोजी काही भागात ढगफुटी सारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाबरावांनी पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हे दोन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल असा अंदाज वर्तवला केला आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या राज्यातील सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी, पंढरपूर, अकलूज, विटा, जत, कर्नाटक, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, महाबळेश्वर, लातूर या भागात ढगफुटी सारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र तीन तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल आणि कडक ऊन पडेल असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का आणि राज्यातील या भागांमध्ये खरंच ढगफुटी सदृश्य पाऊस पडतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.