Panjabrao Dakh Havaman Andaj : यावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाले. मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी देखील सुरुवातीचा काही काळ उसंत घेतल्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातील पावसाचा बॅकलॉग भरून निघाला. जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली यामुळे शेतकरी समाधानी होते.
मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा मोठा खंड पडला आहे. राजधानी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागात सध्या कडक ऊन पडत आहे. काही भागातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून पावसाबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
ती म्हणजे पुढील अडीच महिने पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित एका शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पंजाबरावांनी राज्यात पुढील अडीच महिने पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच राज्यात 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होणार असा अंदाज त्यांनी बांधला आहे. पंजाबरावांनी यावेळी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 11 व 12 ऑगस्ट ला जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात हे दोन दिवस जोरदार पाऊस होणार आणि 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यातील जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या कालावधीत मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार असून राज्यातील इतरही भागात जोरदार पाऊस कोसळणार असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष बाब अशी की, ऑगस्ट प्रमाणे सप्टेंबर मध्ये देखील जोरदार पाऊस होणार आणि ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.