Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे.
राज्यात जवळपास 14 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला असल्याने शेती पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.
आता येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर पिके करपण्याचा धोका देखील वाढत आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना चिंता करू नका आता पावसाला सुरुवात होणार असे सांगितले आहे. आज 16 ऑगस्ट रोजी पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आज पासून पावसाला सुरुवात होणार आहे.
हा पाऊस राज्यात पूर्वेकडून दाखल होणार असून सुरुवातीला पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार आहे. यानंतर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पसरणार आहे. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नदी-नाले भरून वाहतील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत या कालावधीमध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत अहमदनगर आणि नाशिक भागात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने या भागात आता पावसाचा जोर वाढेल असे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार मोठा पाऊस
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे. 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, बीड, पंढरपूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, संगमनेर या भागात खूप मोठा पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी नद्या नाले ओसांडून वाहतील असा पाऊस पडेल.
25 ते 30 ऑगस्ट दरम्यान पुन्हा पाऊस
पंजाबरावांनी 17 ते 22 हे सहा दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच राज्यात 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
एकंदरीत ऑगस्टचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात चांगला मोठा पाऊस पडणार असा अंदाज असल्याने हा हवामान अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना यामुळे जीवदान मिळणार आहे.