Panjabrao Dakh Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला असून काही भागात अतिवृष्टी देखील होत आहे. जवळपास गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातचं ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सोबतच पंजाबरावांनी अतिवृष्टी होण्याचे कारणही या निमित्ताने सांगितले आहे.
खरंतर राज्यात गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागात अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये. पावसाचे हे असमान वितरण मात्र शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे.
काही भागात महापूर सारखी परिस्थिती तयार झाली आहे तर काही भागात पाऊसच पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच मात्र पंजाबराव डख यांनी राज्यात आता ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागातही पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पडणारा पाऊस आता थांबेल आणि राज्यातील ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागात पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
खरतर राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटला तरीही अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. पण आता त्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे.
4 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि राज्यात सर्वदूर पाऊस पडणार, या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टी होत असल्याचा मत त्यांनी व्यक्त केले आहे तसेच यामुळेच दरडी देखील कोसळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.