Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने आता जोरदार कमबॅक केले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात देखील राज्यातील काही जिल्हे वगळता पावसाने उघडीप दिली.
पाऊस पडत होता मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत होता जोरदार पाऊस राज्यात कुठेच झाला नव्हता. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा व आजूबाजूच्या परिसरात तसेच कोकणातील काही जिल्ह्यात थोडासा पावसाचा जोर अधिक होता मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर हा खूपच कमी होता.
यामुळे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलैचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आणि पावसाने आपले रुद्ररूप दाखवले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर कोकणात, दक्षिण कोकणात, पूर्व विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
जास्तीच्या पावसामुळे कोकणातील बहुतांशी नद्या दुतर्फा वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे कोकणात पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता शासनाकडून आणि प्रशासनाकडून यंत्रणेला कामावर लावण्यात आले आहे.
विदर्भात देखील अशीच परिस्थिती आहे विदर्भातील जवळपास 40 गावांमध्ये पाणी साचले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एकंदरीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे राज्यात सध्या जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांचे पावसाने नुकसानही केले आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात एक ऑगस्टपर्यंत कसे हवामान राहणार, किती दिवस पाऊस पडणार याबाबत डख यांनी महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै पर्यंत राज्यात एक दिवसाआड पाऊस पडणार आहे. यात आज राज्यातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात मोठा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच राज्यात 28 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी भरवला आहे. अर्थातच एक ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राज्यात भाग बदलत 30 जुलै पर्यंत एक दिवसाआड पाऊस होणार असा पंजाबरावांनी अंदाज व्यक्त केला आहे. तसेच यंदा दुष्काळ पडणार नसून, जोरदार पाऊस होईल, मान्सून समाधानकारक राहील असे देखील मत यावेळी पंजाबरावांनी नमूद केले आहे.