Panjabrao Dakh : काल 14 ऑगस्ट 2023 ला ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा हा कोरडा गेल्यानंतर आता राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे.
गेल्या जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला होता मात्र या चालू महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड आहे. काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे मात्र म्हणावा तसा जोरदार पाऊस या महिन्यात कुठेच झाला नाही.
याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पीक संकटात आले आहे. पण राज्यात आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. आज 15 ऑगस्टला राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. उद्यापासून मात्र पावसाचा जोर वाढणार आहे.
पंजाबरावं डख यांनी याबाबत माहिती दिली आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल तर उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे. विशेष म्हणजे उद्यापासून दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे.
यामध्ये 17, 18, 19 ऑगस्टला राज्यात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 28, 29, 30 ऑगस्टला देखील राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सुरुवातीला पूर्व विदर्भात पावसाचे आगमन होईल, त्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस सरकेल आणि मग हळूहळू मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे तसेच मध्य महाराष्ट्राकडे पावसाची वाटचाल सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
राज्यात 15 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत रोजाना भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीत चांगला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळणार आहे. यामुळे पंजाब रावांचा हा अंदाज खरा ठरावा अस साकडं देवाला घातलं जात आहे.