राज्यातील घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडा पुन्हा 4 हजार 500 घरांसाठी लॉटरी काढणार, केव्हा निघणार सोडत ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षानंतर चार हजार 82 घरांसाठी मे 2023 मध्ये लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या चार हजार 82 घरांसाठी काल अर्थातच 14 ऑगस्ट 2023 रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमुळे मुंबईमध्ये घर घेण्याचे हजारो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

अशातच आता म्हाडाच्या माध्यमातून आणखी एक गुड न्यूज समोर येत आहे. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. जयस्वाल यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून चार हजार पाचशे घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी काढली जाणार आहे. निश्चितच म्हाडा कोकण मंडळाकडून ऑक्टोबर मध्ये ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात साडेचार हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार असल्याने यामुळे घर घेणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान या लॉटरीची जाहिरात येत्या काही दिवसात प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर यासाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सादर केलेल्या अर्जांपैकी पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध होईल आणि ऑक्टोबर महिन्यात याची प्रत्यक्षात सोडत निघेल अशी माहिती समोर आली आहे.

काय म्हटले म्हाडाचे उपाध्यक्ष 

काल म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबई मंडळाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी कोकण मंडळाच्या साडेचार हजार घरांसाठी ऑक्टोबर मध्ये लॉटरी निघणार असल्याची घोषणा केली आहे.

तसेच या कार्यक्रमात जयस्वाल यांनी गिरणी कामगारांना बीडीडी चाळीत घर मिळावे म्हणून काम सुरू असल्याचेही सांगितले आहे. तसेच लॉटरीमध्ये लागलेल्या घराची किंमत दोन टप्प्यांत भरता येईल.

२५ टक्के रक्कम प्रथमतः आणि नंतर ७५ टक्के रक्कम भरता येणार अशी महत्त्वाची माहिती देखील दिली आहे. शिवाय म्हाडाच्या लॉटरीत विजयी ठरलेल्या अर्जदारांना सहा महिन्यांत घर ताब्यात देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नमूद केले आहे. 

Leave a Comment