Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे हवामान तज्ञ विशेष प्रसिद्ध आहेत. डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. यामुळे पंजाबराव नेहमीच शेतकऱ्यांमध्ये चर्चेत राहतात. अशातच पंजाबरावांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा असा हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
वास्तविक, भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 9 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सह कोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पण 9 सप्टेंबर नंतर राज्यातील कोकण विभागातच पाऊस पडणार असे देखील IMD कडून सांगितले गेले आहे. पंजाबराव डख यांनी देखील पावसासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस होणार आहे. म्हणजेच राज्यात पुढील पाच दिवस चांगला पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातही या कालावधीत चांगला पाऊस पडू शकतो असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. निश्चितच पंजाबरावांनी येत्या मंगळवार पर्यंत महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यातही यंदा चांगला पाऊस पडणार का हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने 5 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर दरम्यान राज्यातुन परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होणार असा अंदाज वर्तवला आहे.
तसेच काही हवामान तज्ञांनी परतीचा पाऊस यावर्षी चांगला बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी देखील ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असे यावेळी नमूद केले आहे. पंजाबरावांच्या मते, या चालू सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार, दुष्काळ पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
खरंतर जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. या चार महिन्यात जेवढा पाऊस पडतो त्यावरच संपूर्ण वर्षाचे पीक पाण्याचे नियोजन आखले जाते. यंदा मात्र जून ते सप्टेंबर पैकी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात फारसा पाऊस पाहायला मिळालेला नाही.
फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने हा अंदाज आता खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.