Panjabrao Dakh Maharashtra News : या चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली आहे. जवळपास गेली दहा ते अकरा दिवस राज्यात कुठेच जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जून महिन्यात पावसाचा मोठा खंड होता, त्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला.
जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. परिणामी अनेक भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले. मात्र असे असले तरी उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जुलै महिन्यात देखील समाधानकारक पाऊस पडला नाही.
विशेष म्हणजे आता गेला काही दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने या भागातील पिके संकटात सापडली आहेत. आगामी काही दिवस जर पाऊस पडला नाही तर पिके करपण्याचा धोका आहे. यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती असून तेथील शेतकरी देखील जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात कस हवामान राहणार आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात केव्हा होणार ? याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पाऊस पडणार का ?
उद्यापासून अर्थातच 11 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. या कालावधीत जरी महाराष्ट्रात पाऊस पडणार असला तरी देखील पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. 13 ऑगस्ट नंतर मात्र महाराष्ट्रातील हवामानात अमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. तसेच 15 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात केव्हा कोसळणार जोरदार पाऊस ?
16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होईल असं मत त्यांनी व्यक्त केल आहे. या कालावधीत चांगला पाऊस बरसणार असून यंदा कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.