Panjabrao Dakh Maharashtra Rain : डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकताच एका हवामान अंदाज वर्तवला होता. या हवामान अंदाजात त्यांनी 12 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असे नमूद केले होते. यानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.
डख 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान रोज भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. ज्या ठिकाणी आतापर्यंत पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी या कालावधीत पाऊस पडणार आहे. ज्या गावांमध्ये अजून पावसाचा एक थेंबही नसेल त्या गावात सुद्धा या कालावधीत पाऊस पडेल असे त्यांनी नमूद केले आहे.
पण या कालावधीत सर्वदूर पाऊस पडणार नसून तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान पंजाबरावांचा हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून काही भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
पण हा पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर पडत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने ओढ दिलेली असल्याने आता खरीप हंगामातील पेरणी केलेल्या पिकांना पावसाची गरज आहे. तर काही भागात अजूनही पेरणी झालेली नाही.
यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे. पेरणी झालेली पिके पावसाअभावी करपतील असे सांगितले जात आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची नामुष्की ओढावू शकते असे काही शेतकरी नमूद करत आहेत.
अशातच मात्र बळीराजासाठी एक सुखद वार्ता समोर येत आहे. पंजाबराव डख यांनी आता नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. नुकताच डख यांनी 19 जुलै ते 26 जुलै दरम्यान राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा जोरदार राहणार असून नदीनाले ओसांडून वाहतील अशी परिस्थिती देखील तयार होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.या कालावधीत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी बांधला आहे. जुलै महिन्यात यंदा चांगला जोरदार पाऊस पडणार आणि शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. निश्चितच आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का हे पाहणे विशेष खास राहणार आहे.