Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : गेला संपूर्ण आठवडा राज्यात जोरदार पाऊस सुरु होता. प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणाची शेती पिके संकटात आलीत.
शेतात पाणी साचले असल्याने पिके खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पावसामुळे मात्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणाच्या जलाशयात वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भाग कोरडाच आहे. राज्यातील काही भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.
विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अजूनही पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, तेथील शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा काळ उलटत चालला आहे तरीही जोरदार पाऊस होत नसल्याने हे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे.
खरंतर, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अजूनही शेतात पाणी साचेल असा पाऊस पडलेला नाही. अजूनही नद्यांना पाणी आलेले नाही. यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आतुरता लागून आहे.
अशातच मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. डख यांच्या मते ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. या दोन महिन्यात कमी वेळात अधिक पाऊस पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे, तळे अगदी कमी वेळेत भरले जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंढरपूरमध्ये आयोजित एका शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख यांनी ही माहिती दिली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांनी नुकताच ऊस परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी पंजाबराव डख यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी डख यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असला तरी देखील पश्चिम महाराष्ट्रात पाऊस खूपच कमी असल्याचे सांगितले. मात्र, आता चिंता करण्याचे काही कारण नाही कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार.
कमी वेळेत धरणे-तळे भरून निघतील अस भाकीतही त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे. निश्चितच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची वार्ता राहणार आहे. तसेच आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का ? याकडे पश्चिम महाराष्ट्रासहित संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.