Panjabrao Dakh New Havaman Andaj Of October 2023 : राज्यातील शेतकरी बांधव सध्या मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या पावसाळी हंगामात जास्तीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके नेस्तनाभूत झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले.
यावर्षी मात्र परिस्थिती पूर्णपणे भिन्न बनली आहे. गेल्या वर्षी जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर यंदा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर्षी मान्सून काळाचे जवळपास चार महिने उलटले आहेत. जवळपास पावसाळा संपला असून आता फक्त मान्सूनचा परतीचा प्रवास बाकी आहे.
परतीच्या प्रवासात विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु संपूर्ण पावसाळी काळात यावर्षी महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. सुरुवातीला जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची तीव्रता वाढली, जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. परिणामीं जून महिन्याची तूट बऱ्यापैकी भरून निघाली.
पण ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आणि आता सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित असा पाऊस पाहायला मिळत नाहीये. या चालू सप्टेंबर महिन्यात सात ते दहा तारखेदरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस झाला. यानंतर मात्र पावसाने पुन्हा महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. 14 तारखेला आणि 19 तारखेला राज्यातील काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे मात्र पावसाचा जोर खूपच कमी आहे. काल पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात जरूर मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली मात्र राज्यातील उर्वरित भागात अपेक्षित असा पाऊस पाहायला मिळत नाही. काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे आणि यामुळे त्या ठिकाणी शेती पिके पाण्याखाली आली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. एकंदरीत सध्या महाराष्ट्रात पावसाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 28 सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे.
म्हणजेच या कालावधीमध्ये राज्यात सर्वदूर पाऊस होणार नाही तर भाग बदलत पाऊस होईल. याशिवाय त्यांनी ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असून 5 ऑक्टोबर नंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन ऑक्टोबर महिन्यात काढण्यासाठी येत असेल त्यांनी 5 ऑक्टोबर पूर्वी सोयाबीनची काढणी पूर्ण करून घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले आहे.
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे 3 ऑक्टोबरला बंगालच्या खाडीत तीव्र चक्रीवादळ तयार होणार आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी या हवामान अंदाजात यंदा परतीचा पाऊस चांगला बरसेल असा आशावाद व्यक्त केला आहे.