Panjabrao Dakh New Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. मात्र भारतीय हवामान विभागाने आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता आहे तर विदर्भातील उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.
यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरतर गेल्या ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला. यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट सप्टेंबर महिन्यातून भरून निघावी अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण सप्टेंबर महिन्यात देखील आतापर्यंत दोन-तीन दिवस वगळले तर फारसा पाऊस झालेला नाही.
यामुळे आता या महिन्यातील उर्वरित दिवसांमध्ये तरी जोरदार पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जर राज्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाला तर ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघू शकते असे मत काही तज्ञ लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी आज पासून म्हणजेच 13 सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 13 सप्टेंबरपासून पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे.
तसेच उद्या 14 सप्टेंबर पासून पश्चिम विदर्भात पावसाला सुरुवात होईल आणि 15 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. तसेच 16 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढेल आणि सर्वदूर पाऊस पडेल असा हवामान अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील त्यांनी नाकारलेली नाहीये. तसेच राज्यात 25 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडत राहणार असे सांगितले जात आहे.