Panjabrao Dakh News : पंजाबरांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा मेसेज दिला आहे. पंजाबरावांनी पुन्हा एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या उर्वरित दिवसात राज्यात कसे हवामान राहणाऱ्या बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पाऊस पडणार की नाही तसेच दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत पंजाबरावांनी महत्त्वाचे अपडेट दिले आहे. खरंतर राज्यात 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यानच्या तीन दिवसात मोठा पाऊस झाला.
कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या कालावधीमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे पावसाअभावी करपत असलेल्या पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाले आहे. मात्र दहा तारखेपासून पुन्हा एकदा राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे.
यामुळे पुन्हा एकदा खरिपातील पिके संकटात सापडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. अशातच मात्र पंजाबरावानी शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला असून आता महाराष्ट्रात पावसाला केव्हा सुरुवात होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता 14 सप्टेंबर पासून म्हणजेच बैलपोळ्यापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. खरंतर राज्यात 13 सप्टेंबर पासूनच पावसाला सुरुवात होईल मात्र सुरुवातीला हा पाऊस विदर्भात राहणार आहे. 13 सप्टेंबर पासून राज्यातील विदर्भ विभागात पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हळूहळू पाऊस पुढे सरकणार आहे.
राज्यात 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे. मात्र पावसाचा खरा जोर वाढेल तो 16 सप्टेंबर नंतर. 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते असे पंजाबरावांनी नमूद केले आहे.
याशिवाय 16 ते 20 दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच काय की गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा नवीन जोमाने महाराष्ट्रात एन्ट्री करणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे.