Panjabrao Dakh : सध्या कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आले आहेत.
नदीकिनारी वसलेल्या गावांना त्यामुळे मोठा फटका बसत आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस पडत नसल्याने तेथील शेतकरी चिंतेत आहेत.
अशातच मात्र पंजाब रावांनी पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी आता विदर्भ, कोकण आणि मराठवाडा वगैरे भागात सुरू असलेला पाऊस थांबणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच त्या भागात सुरू असलेला पाऊस थांबेल आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच ज्या ठिकाणी अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही त्या भागात पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 4 ऑगस्ट रोजी चक्रीवादळ तयार होऊन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता तयार होणार आहे. या परिस्थितीमुळे 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळणार असा अंदाज यावेळी पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी पंजाब रावांनी अतिवृष्टी बाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हटलेत की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या कमी वेळात जास्त पाऊस कोसळत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळेच अतिवृष्टी होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यामुळेच दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचं त्यांचं मत आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता तापमान वाढून पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे सूक्ष्म निरीक्षण पंजाब रावांनी नोंदवल आहे. एवढेच नव्हे तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यात काही भागात महापूर तर काही भागात पाऊसच पडत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.