Panjabrao Dakh : गेल्या वर्षाचा शेवट अवकाळी पावसाने झाला. या वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 दोन्ही महिन्यांमध्ये अवकाळी पावसाने त्राहीमाम माजवला. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होता मात्र फेब्रुवारीत अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक गारपिटीमुळे वाया गेले.
यामुळे आता मार्च महिन्यात हवामान कसे राहणार ? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात महाराष्ट्रातील ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे.
पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज जारी केला आहे.यामध्ये त्यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
काय म्हटलेत पंजाबराव डख ?
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामान 29 फेब्रुवारी पर्यंत प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. अर्थातच आगामी 10 ते 11 दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली शेती कामे उरकून घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला आहे.
या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या गहू आणि हरभरा पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी आणि काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असा सल्ला पंजाबरावांनी दिला आहे.
कारण की, राज्यातील हवामानात 28 फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 29 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
अर्थातच फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच जानेवारी महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर पुन्हा एकदा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे.