Monsoon 2024 Panjab Dakh : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज अर्थातच 12 मे 2024 ला राज्यातील तब्बल 33 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तर कोकणातील पालघर आणि मुंबई सोडून जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले असून या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होणार अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या वादळी पावसाचा आगामी मान्सूनवर काही परिणाम होणार का असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आगामी मानसून संदर्भात पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी मान्सूनचे आगमन कधी होणार, कोणत्या महिन्यात कमी पाऊस आणि कोणत्या महिन्यात जास्त पाऊस पडणार, मान्सून माघारी कधी परतणार ? या संदर्भात डिटेल माहिती दिली आहे.
कधी होणार मान्सूनचे आगमन ?
खरेतर पंजाब रावांनी मागे मान्सून 2024 बाबत एक अंदाज वर्तवला होता. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या सुमारास मोसमी पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. मात्र आता पंजाब रावांनी नुकताच एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
या मध्ये पंजाब रावांनी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 9 जुनच्या सुमारास होणार अशी शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार 22 मे ला मान्सूनचे अंदमानात आगमन होणार आहे. अंदमानात पोहोचल्यानंतर मान्सून पुढील वीस दिवसात आपल्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
म्हणजे 9 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या जून अखेरपर्यंतच पूर्ण होणार आहे. यंदा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. पावसाळ्याच्या तिसऱ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच यावर्षी पाच नोव्हेंबरला मान्सून माघारी परतणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी वर्तवला आहे.
दरम्यान आता पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का आणि मान्सूनचे नऊ जूनला आगमन होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरवर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन सात जूनच्या सुमारास होत असते. यंदा मात्र महाराष्ट्रात मान्सून दोन दिवस उशिराने दाखल होणार असा अंदाज आहे.