Pension Scheme : आयुष्याची संध्याकाळ आरामात जावी यासाठी आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करत आहोत. संसाराचा गाडा चालवून थोडीशी अमाऊंट म्हातारपणासाठी सेव करत आहोत. दरम्यान जर तुम्हीही उतारवयासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण एका सरकारी पेन्शन योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर उतार वयात पेन्शन मिळाल्यास कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासत नाही. यामुळे जर तुम्हालाही उतार वयात पेन्शन मिळावी असे वाटत असेल तर तुम्ही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता.
ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी पेन्शन स्कीम आहे. या बचत योजनेत ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागते आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सदर गुंतवणूकदार व्यक्तीला एक निश्चित पेन्शन उपलब्ध करून दिली जाते.
यामुळे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवायची असेल आणि यासाठी तुम्हाला एखाद्या पेन्शन योजना गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजनेचा पर्याय बेस्ट राहणार आहे.
कारण की या योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकते. यामुळे उतार वयात गुंतवणूकदाराकडे हक्काचा पैसा उपलब्ध असेल.
अटल पेन्शन योजनेतून मिळणार पाच हजार रुपयांची पेन्शन
जर तुम्हाला उतार वयात पाच हजार रुपयांची मासिक पेन्शन हवी असेल तर तुम्हाला अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजनेत तुम्हाला वीस वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते.
अर्थातच जर एखाद्या व्यक्तीने 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर त्याला 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिकाच गुंतवणूक करू शकतात.
दुसरीकडे, एखाद्याने 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तरी देखील त्याला 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो.
आता या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनचा हिशोब थोडक्यात समजून घेऊया. समजा तुमचे वय 18 वर्षे एवढे आहे आणि तुम्ही अटल पेन्शन योजनेत सहभाग नोंदवला आहे. तर तुम्हाला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.
म्हणजे या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करून तुम्ही 60 वर्षानंतर दरमहा 5000 ची पेन्शन घेऊ शकता. जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवे असेल, तर तुम्हाला या कालावधीत दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील.