Personal Loan Details : जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज उद्भवत असते तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे पैशांची मागणी करत असतो. यातून आपली पैशांची गरज अनेक वेळा पूर्ण होते. मात्र अनेकदा मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे पैसे राहत नाहीत अशावेळी आपण बँकेचे दरवाजे ठोकतो.

इमर्जन्सी परिस्थितीत आपण बँकेकडून पर्सनल लोन घेत असतो. देशभरातील विविध बँका आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवत आहेत. यामुळे पैशांची गरज भागते.

Advertisement

मात्र असे असले तरी वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत काहीसे अधिक असतात. यामुळे खूपच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला पाहिजे.

तथापि अनेकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जाबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पगारानुसार किती पर्सनल लोन मंजूर होतं.

Advertisement

यामुळे आज आपण जर एखाद्या व्यक्तीला चाळीस हजार रुपये पगार असेल तर त्याला बँकेकडून कमाल किती रुपयांचे कर्ज मंजूर होऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किमान इतका पगार असेल तरच मिळणार वैयक्तिक कर्ज

Advertisement

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार किमान 15,000 रुपये मासिक पगार असलेल्या लोकांना बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचा अर्थ असा नाही की, पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी मासिक पगार असलेल्या लोकांना वैयक्तिक कर्ज मिळू शकत नाही.

बँकेनुसार ही देखील मर्यादा बदलू शकते. परंतु अनेक बँकांनी किमान 15000 रुपये मासिक पगार असलेल्या लोकांना वैयक्तिक कर्ज मिळू शकते असे मत व्यक्त केले आहे.

Advertisement

आता आपण चाळीस हजार रुपये पगार असेल तर सदर ग्राहकाला किती रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकत ? याविषयी जाणून घेऊया.

तज्ञ सांगतात की, बँका सहसा मासिक उत्पन्नाच्या पटीत रक्कम मंजूर करतात. हे गुणक 10 ते 20 पट किंवा काही प्रकरणांमध्ये त्याहूनही जास्त असू शकतात.

Advertisement

मूलत:, याचा अर्थ असा की 40,000 रुपये मासिक उत्पन्न असलेली व्यक्ती 4 लाख ते 8 लाख रुपयांच्या दरम्यानच्या वैयक्तिक कर्जासाठी पात्र असेल. म्हणजेच चाळीस हजार रुपये ज्याला पगार असेल त्याला चार ते आठ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकते.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *