पंजाबराव डख हवामान अंदाज : 18, 19 आणि 20 एप्रिलला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : सध्या महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात अन तापमानाचा पारा 43° c पर्यंत पोहोचला असतांना राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे. काल राज्यातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपिट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे काल सातारा जिल्ह्यातही वादळी पाऊस पाहायला मिळाला. अशातच आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 18, 19 आणि 20 एप्रिलला महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी मोठी माहिती दिली आहे.

या कालावधीत राज्यातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस हजेरी लावणार का ? गारपीट होणार का ? याबाबत पंजाब डख यांनी मोठी माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण डख यांचा हा नवीन हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेणार आहोत.

काय म्हणताय पंजाबराव डख ?

पंजाबराव डख यांनी 18 ते 20 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील हवामानाबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी या कालावधीमध्ये राज्यातील कोकण, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज दिला आहे.

डख यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात 20 एप्रिल पर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. कालावधीत मराठवाडा विभागात देखील हलक्या पावसाचा अंदाज त्यांनी दिला आहे.

कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार असल्याने याचा प्रभाव मराठवाड्यावर देखील पाहायला मिळेल आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते असे डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे.

डख यांनी आज अर्थातच 18 एप्रिलला मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी दिला आहे.

यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

तसेच काल राज्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली असल्याने पशुधनाचे देखील नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

Leave a Comment