काय सांगता ! भारतातील ‘या’ राज्यात शोधूनही सापडणार नाहीत साप, ‘स्नेक फ्री स्टेट’ म्हणून ओळखले जाते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral News : साप हा एक सरपटणारा विषारी प्राणी आहे. आपल्या देशात सापाच्या 350 हून अधिक प्रजाती आहेत. यातील बहुतांशी प्रजाती मात्र बिनविषारी आहेत. तथापि साप पाहिल्यानंतर आपल्या पायाखालची जमीन सरकते. आपण सर्वजण सापाला खूपच घाबरत असतो.

यामुळे अनेकदा भीतीपोटी काही लोक सापाला मारून टाकतात. परंतु साप हा पर्यावरणातील आवश्यक घटक आहे. यामुळे सापाचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

हेच कारण आहे की सापाच्या संवर्धनासाठी अनेक संस्था काम करत आहेत. खरे तर साप हा विषारी आणि निम विषारी प्राणी आहे.

एका आकडेवारीनुसार भारतात जेवढे साप आहेत त्यापैकी फक्त 17 टक्के साप हे विषारी आढळले आहेत. आपल्या देशात सर्वात जास्त साप केरळ राज्यात आढळतात.

आपल्या महाराष्ट्रात देखील सापांची संख्या मोठ्या प्रमाणात असून राज्यात अनेक विषारी जातीचे साप देखील आढळतात. परंतु तुम्हाला भारतातील स्नेक फ्री स्टेट बाबत माहिती आहे का? नाही मग आज आपण याची माहिती पाहणार आहोत.

आज आपण भारतातील अशा एका राज्याची माहिती जाणून घेणार आहोत जिथे एकही साप आढळत नाही. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण भारतात असेही एक राज्य आहे जिथे साप तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.

कोणत्या राज्यात साप आढळत नाही

आम्ही ज्या राज्याबाबत बोलत आहोत ते आहे लक्षद्वीप. देशातील हे एकमेव असे राज्य आहे जेथे साप आढळत नाहीत. लक्षद्वीप हे सापमुक्त राज्य आहे.

इथे कुत्रेही आढळत नाहीत. लक्षद्वीप प्रशासन त्यांच्या राज्याला साप आणि कुत्रामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न देखील करत आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप हे विशेष चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप येथील पर्यटनाचा एक व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर लक्षद्वीपची तुलना मालदीव सोबत होऊ लागली.

या व्हिडिओ नंतर अनेक भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीप ला पर्यटनाला जाण्याचा निर्णय घेतला. याच लक्षद्वीप मध्ये साप आढळत नाहीत. विशेष म्हणजे येथे पर्यटकांना कुत्रा देखील घेऊन जाता येत नाही.

Leave a Comment