Personal Loan Details : जर अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही सर्वप्रथम आपण आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्र परिवाराकडून पैशांची ऍडजेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करता. पण पैशांची ऍडजेस्टमेंट झाली नाही तर मग आपले पाय थेट बँकेच्या दिशेने वळत असतात. बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊन आपण आपल्या पैशांची गरज भागवत असतो.
पण अनेकांच्या माध्यमातून ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न 20,000 रुपये आहे त्यांना बँकेकडून किती रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर लागते
पर्सनल लोन हे खरे तर बँकांनी दिलेले असुरक्षित कर्ज आहे. असुरक्षित कर्जामध्ये ग्राहक कोणतीही हमी देत नाही. ग्राहकाच्या त्याच्या नियमित उत्पन्नानुसार कर्जाची परतफेड करण्याची क्षमता लक्षात घेऊन हे कर्ज मंजूर केले जाते.
मात्र वैयक्तिक कर्जासाठी बँकांच्या माध्यमातून अधिकचे व्याजदर आकारले जाते. इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागते. त्यामुळे तज्ञ लोक फारच गरजेचे असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढावे असा सल्ला देतात.
20 हजार पगार असल्यास किती कर्ज मिळणार
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मासिक 20,000 रुपये पगार असलेल्या आणि आधीपासूनच कोणतेही कर्ज नसेल, तर बँका दोन वर्षांच्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर करू शकतात.
वैयक्तिक कर्ज वार्षिक 9 टक्के ते 24 टक्के व्याजदरावर उपलब्ध होऊ शकते. वैयक्तिक कर्जावरील सरासरी व्याज दर सुमारे 12 टक्के आहे. वैयक्तिक कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत असू शकतो. वैयक्तिक कर्जाची रक्कम साधारणपणे 50,000 ते 25 लाख रुपये असू शकते.
विशेष म्हणजे काय बँका चाळीस लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन देतात. पर्सनल लोन देताना बँकांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत तर पाहिलेच जातात याशिवाय सिबिल स्कोर देखील चेक केला जातो. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच वैयक्तिक कर्ज दिले जाते.
750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असलेल्या लोकांना किमान व्याजदरात आणि लवकर पर्सनल लोन मंजूर होते. ज्यांचा सिबिल स्कोर कमी असतो त्यांना वैयक्तिक कर्ज नाकारले जाते किंवा मग अधिकच्या व्याजदरात वैयक्तिक कर्ज मंजूर होते.