Petrol Diesel Rate : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. अर्थातच लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजवणार आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कौतुकास्पद निर्णय घेतले जात आहेत.
मतदारांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नुकत्याच काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमती आणखी शंभर रुपयांनी कमी झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना याचा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय, काल अर्थातच 14 मार्च 2024 रोजी केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, केंद्र सरकारने काल म्हणजे गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याची घोषणा केली.
पेट्रोलच्या दरात दोन रुपयाची आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. पण कारण आणि वेळ कोणतीही असली तरी देखील या निर्णयामुळे थेट सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
नवीन दर केव्हापासून लागू होणार
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात केली आहे. दरम्यान हे नवीन रेट आज अर्थातच 15 मार्च 2024 रोजी सकाळी सहा वाजेपासून लागू राहणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
१५ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होतील, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेल दरकपातीमुळे देशातील ५८ लाखांहून अधिक मालवाहतूकदारांसह ६ कोटी कार आणि २७ कोटी दुचाकीस्वारांना फायदा होईल. तसेच देशातील महागाई कमी होण्यास मदत होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
नवीन रेट पहा
नवीन दर लागू झाल्यानंतर आता राजधानी मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये आणि डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर या दरात उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे पेट्रोल 94.72 आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर या दरात उपलब्ध होणार आहे.
कोलकत्ता येथे पेट्रोल 103.94 आणि डिझेल 90.76 रुपये प्रति लिटर या दरात उपलब्ध होणार आहे. चेन्नई येथे पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92 रुपये प्रति लिटर या दरात मिळणार आहे.