Pik Vima Yojana Arj : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पिक विमा योजनेत अमूलाग्र बदल केला आहे. आता राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेचा जीआर निर्गमित करण्यात आला असून याची अंमलबजावणी यंदाच्या खरीप हंगामापासून केली जाणार आहे. एक रुपयात पिक विमा योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागू राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, या आधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के एवढा हफ्ता म्हणजे पीक विम्याचा प्रीमियम भरावा लागत होता.
मात्र आता शेतकरी हिश्याची ही रक्कम राज्य शासनाकडून भरली जाणार आहे. शेतकऱ्यांना आता पिक विमा काढण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. खरीप हंगामातील जवळपास 15 पिकांसाठी या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिल जाणार आहे.
खरीप हंगामासाठी पिक विम्याचा अर्ज भरणे हेतू 31 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेअंतर्गत पिक विम्यासाठी कशा पद्धतीने घरबसल्या अर्ज केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.
पिक विम्यासाठी असा करावां लागणार अर्ज शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर गेस्ट फार्मर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर शेतकऱ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यानंतर दिलेल्या रकान्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा आहे. यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे. मग गेट ओटीपी वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे.
एवढे केल्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन सक्सेस होणार आहे. यानंतर मग शेतकऱ्यांना वय, जात किंवा प्रवर्ग, लिंग निवडायचे आहे. यानंतर फार्मर टाईप मध्ये अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक यापैकी तुमचा योग्य पर्याय निवडायचा आहे. मग फार्मर कॅटेगिरी मध्ये शेतकरी स्वतः जमिनीचे मालक आहेत की भाडेतत्त्वावर शेती करत आहेत हे निवडायचे आहे.
यानंतर शेतकऱ्यांना पत्त्याविषयी सविस्तर माहिती भरायची आहे. पुढे मग फार्मर आयडी वरती यूआयडी हा पर्याय निवडायचा आहे. यूआयडी अर्थातच आधार क्रमांक टाकायचा आहे. यानंतर व्हेरिफाय करायचे आहे. यानंतर मग व्हेरिफिकेशन सक्सेस होईल. यानंतर शेतकऱ्यांना बँक खात्याचा तपशील भरावा लागणार आहे.
बँकेची सविस्तर माहिती भरल्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे. मग create युजर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला पुन्हा दाखवली जाईल. ही माहिती काळजीपूर्वक वाचून नेक्स्ट पर्यावर क्लिक करायचे आहे. पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती दाखवलेली असेल.
यात बँक खाते निवडायचे आहे आणि नेक्स्ट पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर पिक विमा योजना आणि जमिनीच्या क्षेत्राबाबत माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये राज्य महाराष्ट्र आणि स्कीम प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायचे आहे. यानंतर लँड डिटेल्स मध्ये तुम्हाला पिकाची सर्व माहिती भरावी लागणार आहे.
तुम्ही जर एकापेक्षा जास्त पिकासाठी विमा भरत असाल तर मिक्स क्रॉप या पर्यायाला yes करायचे आहे. पण जर एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर नो पर्याय सिलेक्ट करून एक पीक निवडायचे आहे. यानंतर मग पेरणीची तारीख, खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकायचा आहे.
मग पुढे व्हेरिफाय वर क्लिक करायचे आहे. यानंतर स्क्रीनवर तुमच्या नावावर किती जमीन आहे हे दिसेल. यानंतर वर्तुळावर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. येथे insured एरिया मध्ये तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा विमा उतरावाचा आहे तेवढे क्षेत्र नमूद करावे लागणार आहे.
यानंतर मग नेक्स्ट पर्यायावर क्लिक करायचे आहे. एवढे झाल्यानंतर तुम्हाला पिक विमा योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि ८-अ उतारा, एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन अपलोड करायचा आहे.
शेवटी पीकपेऱ्याचं घोषणापत्र अपलोड करायचं आहे. हे तिन्ही कागदपत्रे अपलोड करून झालेत की तिन्ही समोरच्या अपलोड पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तिथे सक्सेस असं दाखवेल. मग Next वर क्लिक केलं की, शेतकऱ्याची, बँक खात्याची आणि पिकाची माहिती आणि किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल.
मग तुम्हाला SUBMIT वर क्लिक करावं लागणार आहे. यानंतर मग तुमच्या मोबाईलवर याचा एक मेसेज येईल. यानंतर तुम्हाला पिक विम्याची रक्कम म्हणजेच एक रुपया भरावा लागणार आहे. ही रक्कम तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यूपीआय किंवा क्यूआर कोड वापरून भरू शकता.
रक्कम भरली की तिथे तुम्हाला अर्जाची पावती मिळणार आहे. Print Policy Receipt या पर्यावर क्लिक करून तुम्ही ही पावती डाऊनलोड करू शकणार आहात. अशा तऱ्हेने तुम्ही पिक विमा योजनेसाठी स्वतः अर्ज करू शकता. जर आपणास स्वतः अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर आपण सीएससी सेंटरवर जाऊन देखील अर्ज करू शकता.
विशेष म्हणजे सीएससी सेंटरवर तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही कारण की, सीएससी सेंटरवर अर्ज भरण्यासाठी संबंधित कंपनीच्या माध्यमातून सेंटर चालकांना प्रति अर्ज 40 रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच सीएससी सेंटरवर देखील तुम्हाला एक रुपयातच पिक विमा अर्ज भरून मिळणार आहे.