चीनला जें जमलं नाही ते भारताने करून दाखवलं ! आता मुंबईहून 90 मिनिटात गाठता येणार पुणे ! जगातील सर्वात रुंदीचा ‘हा’ बोगदा वाहतुकीसाठी होणार सुरू, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भारत सरकारने भारतमाला परियोजनेअंतर्गत विविध महामार्गांची कामे हाती घेतली आहेत. यापैकी काही महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत.

भारतात मोठमोठे महामार्ग, ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे, उड्डाणपूल, सागरी मार्ग, भुयारी मार्ग, एलिवेटेड कॉरिडॉर इत्यादी रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. एकंदरीत देशात इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी शासनाकडून तसेच प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नामुळे देशात दळणवळण व्यवस्था मजबूत झाली आहे.

खरंतर कोणत्याही देशाच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे की विकसनशील देशाच्या पंगतीमधून उठून विकसित होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतात सध्या रस्ते विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

यामध्ये देशात जगातील सर्वाधिक रुंदीचे दोन बोगदे तयार केले जात आहे. हे बोगदे मुंबई-पुणे एक्सप्रेस – वे वर विकसित होत असून या बोगद्यांमुळे खंडाळा घाटातील वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

दरम्यान या दोन्ही बोगद्यांचे काम 70% पर्यंत पूर्ण झाले असून आता लवकरच उर्वरित काम देखील पूर्ण होईल आणि हे बोगदे वाहतुकीसाठी सुरू होतील अशी माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण हे दोन्ही बोगदे केव्हा सुरू होतील आणि या प्रकल्पामुळे प्रवाशांना काय फायदा होईल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

केव्हा सुरु होणार जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत दोन बोगदे तयार केले जात आहेत. या बोगद्यांमुळे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणारा एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आणि दुसरा 8.93 किमी लांबीचा आहे.

विशेष बाब अशी की याची रुंदी 23 मीटर आहे. म्हणून हे बोगदे केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जास्त रुंदीचे राहणार आहेत. यातील प्रत्येक बोगद्यात चार लेन राहणार आहेत. खरंतर हा प्रकल्प मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाचे काम आता जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.

मुंबई-पुणे प्रवास होणार 90 मिनिटात

वास्तविक, सध्या चीनमधील यांगझी नदीखालून 13.7 मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे. हा 16.62 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. मात्र मुंबई-पुणे एक्स्पप्रेस वे वरील खंडाळा बोगदा 23 मीटरपेक्षा जास्त रुंद राहणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा म्हणून हा बोगदा ओळखला जाणार आहे.

यामुळे जे चीनला जमले नाही ते भारताने करून दाखवले असे सांगितले जात आहे. दरम्यान या मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे मुंबई ते पुणेचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.

यामुळे मुंबई ते पुण्याच्या प्रवासात अर्ध्या तासाची बचत होणार आहे. यासाठी 6, 695 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास केवळ 90 मिनिटात पूर्ण करता येणार असा दावा केला जात आहे. 

Leave a Comment