Places To Visit Near You : भारतीय हवामान खात्याने लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे येत्या काही तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. यानंतर मग तेथून आठ ते दहा दिवसांनी अर्थातच 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे.
म्हणजेच लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार हे स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडणार आहेत. दरम्यान जर तुमचाही येत्या पावसाळ्यात कुठे पिकनिकसाठी जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण वन डे ट्रिपसाठी मुंबई जवळ बेस्ट ठिकाण कोणते आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही मुंबईकर असाल आणि पावसाळ्यात वन डे ट्रिप काढायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
लोणावळा : पावसाळ्यात मुंबईकर वन डे ट्रिप साठी लोणावळ्याला जाऊ शकतात. जर तुम्ही मुंबईतच राहत असाल तर अवघ्या दोन तासात तुम्हाला लोणावळ्याला जाता येणार आहे. येथे तुम्हाला पावसाळ्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देत येतील. येथील निसर्ग हा तुमच्या ट्रिपची रंगत वाढवणार आहे.
खंडाळा : पावसाळ्यात खंडाळा घाटाचे दृश्य देखील खूपच मनमोहक असते. मुंबईत राहणाऱ्यांना वनडे ट्रिप मध्ये खंडाळा घाट एक्सप्लोर करता येऊ शकतो. येथील हिरवी झाडे, निसर्ग आणि धबधबा हे खूपच पाहण्यासारखे आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत खंडाळा घाटाला भेट देऊ शकता.
माळशेज घाट : हे देखील ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. जर तुमचाही पावसाळी पिकनिकचा प्लॅन असेल तर माळशेज घाट तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. हा सह्याद्री पर्वतरांगांमधील एक सुंदर घाट आहे. पावसाळी काळात येथे सुंदर धबधबे वाहतात. पावसाळ्यात इथला निसर्ग हा खूपच खुलतो.
मुळशी धरण : पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे मुळशी धरण. मुंबईपासून अवघ्या तीन तासाच्या अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यात वास्तव्याला असाल तर मुळशी धरणाला नक्कीच भेट द्या. वन डे ट्रिप साठी हे ठिकाण सर्वात बेस्ट राहणार आहे.
कर्नाळा किल्ला : पनवेल मधील हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा किल्ला हिरव्यागार निसर्गाने वेढलेला आहे. पावसाळ्यात येथे अनेक पक्षी येतात. त्यामुळे जर तुमचा पावसाळी पिकनिकचा प्लॅन असेल तर या किल्ल्याला नक्कीच भेट द्या.