PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे. नुकत्यांच काही दिवसांपूर्वी PM Kisan च्या लाभार्थ्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला आहे.
तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील सोळावा हफ्ता निवडणुकीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या योजनेचा सोळावा हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी मात्र पात्र शेतकऱ्यांना 4 महत्वाची कामे करण्यास सांगितले गेले आहे. पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे पैशांचे वाटप होत असते. दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो.
अशा तऱ्हेने या योजनेचा पुढील सोळावा हप्ता हा फेब्रुवारी 2024 किंवा मार्च 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात मिळाला 15 वा हफ्ता
27 जुलै रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 14 व्या हप्त्याअंतर्गत 17,000 कोटी रुपये जारी केले होते. ही रक्कम 8.5 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आली होती.
तसेच या योजनेचा पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आला आहे. छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
आता याचा पुढील हप्ता केव्हा जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसानचा 16 वा हप्ता येत्या नवीन वर्षातील फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जमा होऊ शकतो.
हे 4 काम करावे लागणार
PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 16 व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत.
बँक खाते आधार क्रमांकासह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
बँक खाते NPCI शी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
केवायसी तपशील देखील पूर्ण असावा.
जमीन पडताळणी म्हणजेच जमिनीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे.