Pm Kisan Yojana : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 14वा हफ्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. विशेष बाब अशी की, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्या सोबतच वर्ग केला जाणार आहे.
मात्र, या दोन्ही योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे. अशातच केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पीएम किसान योजनेच्या नवीन एप्लीकेशन मध्ये केवायसी करण्यासाठी फेस ऑथेंटीकेशन फिचर आणले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ चेहरा दाखवून घरबसल्या केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
या नवीन ॲप्लिकेशनमध्ये सरकारने सुरू केलेल्या या नवीन फीचरमुळे शेतकऱ्यांना वन-टाइम पासवर्ड किंवा फिंगरप्रिंटऐवजी मोबाईल फोनवर त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळील सीएससी सेंटरवर जाता येत नाहीये त्यांना आता घरबसल्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने फक्त चेहरा दाखवून केवायसी पूर्ण करता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चेहरा दाखवून कशा पद्धतीने केवायसी केली जाऊ शकते? याविषयी जाणून घेणार आहोत.
पीएम किसानचा 14 वा हफ्ता केव्हा मिळणार?
पीएम किसानचा चौदावा हप्ता एक जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. तसेच याच दिवशी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थातच एक जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांना चार हजार रुपये शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
चेहरा दाखवून केवायसीची प्रक्रिया कशी करणार?
यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर वरून पीएम किसानचे अधिकृत एप्लीकेशन डाउनलोड करा. यानंतर FACE RD APP हे आणखी एक एप्लीकेशन तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल.
यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या एप्लीकेशनवर लॉगिन करा, त्यात लाभार्थीचे नाव आणि आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागणार आहे.
आता तुमच्या आधार लिंक केलेल्या नंबरवर एक OTP येईल तो तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे.
यानंतर मग तुम्हाला आता MPIN सेट करावां लागेल आणि सबमिट करावे लागेल.
यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड आणि लॉगआउट असे दोन पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसतील.
या दोन पर्यायांपैकी तुम्हाला डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे. आता तुमची सर्व माहीती येथे दाखवली जाईल.
त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन फीचर ओपन होईल, मग येथे तुम्ही ई-केवायसीचा पर्याय निवडून फेस ऑथेंटिकेशन करु शकता.