Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या देशभरातील करोडो लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेची सुरुवात होऊन आता जवळपास चार ते पाच वर्षांचा काळ उलटला आहे.
या चार ते पाच वर्षांच्या काळात मात्र या योजनेच्या नियमांमध्ये मोठमोठे बदल झाले आहेत. याच्या लाभासाठी केंद्र शासनाने काही कठोर नियम बनवले आहेत. आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया करावी लागते, बँक खाते आधार सोबत संलग्न करावे लागते आणि भूमि अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत कराव्या लागतात.
जर लाभार्थ्यांनी ही तीन कामे केली नाही तर त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. जसं की आपणास ठाऊकच आहे की पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 हप्ते मिळाले आहेत. विशेष म्हणजे पंधरावा हप्ता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात वितरित होणार अशी माहिती समोर आली आहे.
सणासुदीला देशभरातील शेतकऱ्यांना मदत म्हणून पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 15वा हप्ता हा दिवाळी सणाच्या आधीच शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जर नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता मिळाला नाही तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच या योजनेचा पुढील हफ्ता दिला जाईल असे सांगितले जात आहे.
अशातच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांकडून त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार की नाही? याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान आज आपण या योजनेचा 15 हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार की नाही हे कसे चेक करायचे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ?
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे पाहायचे असेल तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. pmkisan.gov.in ही पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
तुम्ही या वेबसाईटवर भेट देऊ शकता. वेबसाईटवर भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला जावे लागेल. येथे तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गट क्रमांक आणि गावाचे नाव ही सर्व माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे.
यानंतर मग तुम्हाला Get Report या पर्यायावर क्लिक करावे लागेल. एवढे केल्यानंतर आता तुमच्या समोर एक लिस्ट येईल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता. जर या बेनीफिशरी लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.
मात्र जर या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही. जर यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला ई-केवायसी आणि बँक खाते आधार सोबत संलग्न करावे लागेल.