Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2019 ला एका नवीन योजनेची घोषणा केली होती. ती योजना म्हणजे पीएम सूर्योदय योजना. या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना मासिक 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देण्याचा सरकारचा मानस आहे.
यातून सोलर पॅनल साठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेला केंद्रातील मोदी कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे. सध्या ही योजना संपूर्ण देशभरात सुरू झाली असून इच्छुक लोक यामध्ये नोंदणी करत आहे.
योजनेची जेव्हा घोषणा झाली तेव्हा या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे संबोधले गेले मात्र आता ही योजना पीएम सूर्य घर मोफत वीज योजना म्हणून ओळखली जात आहे.
या योजनेचे पोर्टल सुद्धा सुरू झाले आहे. या योजनेमुळे सोलर पॅनल बसवून मोफत वीज वापरता येणार आहे. सोलर पॅनलसाठी या योजनेतून अनुदानही मिळणार आहे.
दरम्यान, आता आपण ही योजना सविस्तर समजून घेणार आहोत. तसेच सोलर पॅनल मधून किती वीज तयार होणार, ग्राहकांना याचा किती फायदा होणार हे देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वीज तयार होणार ?
या योजनेतून एक किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
यामध्ये एक किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी तीस हजार रुपये, दोन किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 60 हजार रुपये, तीन किलो वॅटच्या आणि किलोवॅटपेक्षा अधिक तसेच दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी 78 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
सोलर पॅनल मधून किती वीज तयार होणार हे सर्वस्वी सोलर पॅनलच्या क्षमतेवर अवलंबून राहणार आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे तीन किलो वॅट चे सोलर पॅनल बसवले तर महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची वीज तयार होऊ शकणार आहे.
म्हणजेच जर तुम्हाला दर महिन्याला 300 युनिट ची वीज लागत असेल तर तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवावे लागणार आहे.
जर 200 युनिट एवढी वीज तुम्हाला महिन्याला लागत असेल तर तुम्ही दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले पाहिजे. यामुळे वीज ग्राहकांचे वर्षाकाठी वीज बिलावर खर्च होणारे पंधरा हजार रुपयांपर्यंतचे पैसे वाचणार आहेत.