पुढील 4 दिवस पावसाचे ! ‘या’ राज्यात वादळी पावसासह गारपीट होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाने चाळिशीचा टप्पा ओलांडला आहे.

अनेक ठिकाणी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. तर काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचे तापमान आहे. मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधिक तापमान पाहायला मिळतय.

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी तापमानाने विक्रम मोडला. येथील तापमान 40°c क्रॉस करून गेले. यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत.

एकीकडे, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत तर दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

काय म्हणतंय IMD 

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड , मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे पाऊस अन गारपीट होणार अशी शक्यता आहे.

उद्या हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हरियाणा आणि चंडीगड येथे काही ठिकाणी पाऊस होणार असा अंदाज आहे. 29 ला पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थान अन हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे.

तसेच उत्तराखंड मध्ये काही ठिकाणी गारपीट होईल असंही बोलला जात आहे. 30 ला उत्तराखंड येथे पाऊस आणि गारपीट तसेच हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे.

31 ला हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आसाम, मेघालय येथे पाऊस अन उत्तराखंड मधील काही भागात गारपीट होणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्रात कस राहणार हवामान?

आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात देखील वादळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला होता.

पण आता वादळी पावसाचे सावट दूर झाले आहे. आता राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. येत्या काही दिवसात तापमान आणखी तीव्र होणार असा अंदाज आहे.

Leave a Comment