Polytechnic Admission : महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. बारावीचा निकाल 21 मे 2024 ला जाहीर करण्यात आला आहे. तर दहावीचा निकाल हा 27 मे 2024 ला जाहीर झाला आहे. खरेतर, गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या निकालाची आतुरता होती. अखेरकार महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावीचा निकाल डिक्लेअर केला आहे.
त्यामुळे आता पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी देखील विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. दहावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार आहेत. तसेच काही विद्यार्थी डिप्लोमाला जाणार आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी देखील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणार आहेत.
काही दहावी आणि बारावी पास आऊट विद्यार्थी पॉलीटेक्निकला देखील प्रवेश घेणार आहेत. वास्तविक दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी आणि त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
दरम्यान जर तुम्हीही पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आज अर्थातच 29 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे.
यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 25 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच पॉलिटेक्निक प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी ही दोन जुलै 2024 ला जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यावर्षी देखील प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण पॉलिटेक्निक प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस आहे पॉलीटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, इच्छुक विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 29 मे ते 25 जून 2024 या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
तसेच याच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 29 मे ते 25 जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे.
या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 27 जून 2024 ला जाहीर केली जाणार आहे.
तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप घेण्यासाठी 28 ते 30 जूनला जाहीर केली जाणार आहे.
अंतिम गुणवत्ता यादी ही 2 जुलै 2024 ला जाहीर केली जाणार आहे.