Pomegranate Farming : डाळिंब हे एक प्रमुख फळ पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. राज्यातील नाशिक जिल्हा हा डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा हा भाग डाळिंबाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. खरे तर, डाळिंब या फळ पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. कमी पाण्यात तयार होणारे हे पीक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी फायदेशीर ठरलेले आहे.
यामुळे कृषी तज्ञ शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीचा सल्ला देत आहेत. ज्या ठिकाणी डाळिंब पिकासाठी पोषक हवामान आहे तिथे डाळिंबाची लागवड झाली पाहिजे असा सल्ला कृषी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
दरम्यान, आज आपण देशातील अशा चार राज्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत जिथे डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. या चार राज्यांमधील उत्पादन एकूण उत्पादनापैकी 95 टक्के एवढे आहे.
भारतात घेतल्या जाणाऱ्या एकूण डाळिंब उत्पादनापैकी देशातील चार राज्यांमध्ये 95 टक्के एवढे डाळिंब उत्पादन घेतले जात आहे. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
एका आकडेवारीनुसार, भारतात सर्वात जास्त डाळिंबाचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. येथे दरवर्षी डाळिंबाचे विक्रमी उत्पादन होत आहे.
आपल्या राज्यात 54.85% एवढे उत्पादन घेतले जात आहे. यानंतर गुजरातमध्ये डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन होते. उत्पादनाच्या बाबतीत गुजरातचा दुसरा क्रमांक लागतो.
येथे 21.28% एवढे उत्पादन घेतले जाते. यानंतर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत कर्नाटक हे तिसऱ्या क्रमांकावर येते.
येथे 9.51% एवढे उत्पादन घेतले जात आहे. तसेच आंध्र प्रदेश या राज्यात 8.82% एवढे उत्पादन घेतले जात आहे. आंध्र प्रदेशचा या यादीत चौथा क्रमांक लागतो.