Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकजण आपल्या कमाईचा एक हिस्सा कुठे ना कुठे गुंतवण्याचा विचार करतात. किंबहुना अनेकांनी आपल्या कमाईपैकी काही रक्कम गुंतवली देखील असेल. दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात कुठे गुंतवणुक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. आजची बातमी अशा गुंतवणूकदारांसाठी अधिक खास राहणार आहे ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे.

खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागले आहे. याशिवाय पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.

Advertisement

पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमधील गुंतवणूक मात्र पूर्णपणे सुरक्षित असते. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण पोस्टाच्या सिनीयर सिटिझन सेव्हिंग स्कीम या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिस 8% व्याज देते. म्हणजे एफडी पेक्षाही अधिकचे व्याजदर या योजनेतून मिळते. मात्र ही बचत योजना जेष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेली आहे.

Advertisement

कशी आहे पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम

पोस्टाच्या या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2 टक्के एवढे विक्रमी व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमाल वीस हजार रुपये प्रति महिना एवढा परतावा मिळू शकणार आहे.

Advertisement

या योजनेत किमान एक हजार रुपये आणि कमाल 30 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवता येते. या योजनेत 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत जॉईंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते. या योजनेचा कालावधी हा पाच वर्षे एवढा आहे.

जर मॅच्युरिटीच्या पूर्वीच अर्थातच पाच वर्षाच्या आधीच या योजनेत गुंतवलेला पैसा काढायचा असेल तर मात्र पेनल्टी द्यावी लागते. या योजनेत VRS घेणारे व्यक्ती 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वय असतांनाही गुंतवणूक करू शकणार आहेत.

Advertisement

तसेच, सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वय असतांनाही गुंतवणूक करू शकणार आहेत. मात्र यासाठी देखील काही नियम, अटी आणि निर्बंध लावलेले आहेत.

कसे मिळणार महिन्याकाठी 20000

Advertisement

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून महिन्याला वीस हजार रुपये मिळवायचे असतील तर यासाठी तुम्हाला 30 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

तुम्ही तीस लाख रुपयांची यात गुंतवणूक केली तर तुम्हाला 8.2% या व्याजदराने 2 लाख 46 हजार रुपये एवढे वार्षिक रिटर्न मिळणार आहेत म्हणजेच महिन्याला वीस हजार रुपयाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *