पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम 9 टप्प्यात होणार ? कसे असणार रिंग रोडचे बांधकामाचे टप्पे ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणे गेल्या काही वर्षांपासून आपल्या वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखली जाऊ लागली आहे. दरम्यान, शहरातील हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोडचे काम हाती घेतले आहे.

सध्या स्थितीला पुणे रिंग रोडचे भूसंपादन युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या प्रकल्पासाठी 70 टक्के एवढे भूसंपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम दोन भागात विभागले गेले आहे.

पुणे रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड असे दोन भाग करण्यात आले आहेत. यातील पश्चिम भागातील रिंग रोडचे भूसंपादन बऱ्यापैकी पूर्ण झाले असून पूर्व रिंग रोडच्या भूसंपादनाला देखील चांगलीच गती मिळाली आहे.

यामुळे यादेखील भागातील रिंग रोडचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण होईल असे बोलले जात आहे. दरम्यान याच रिंग रोड संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड चे काम एकूण नऊ पॅकेज मध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पश्चिम रिंग रोड चे काम पाच पॅकेज मध्ये आणि पूर्व रिंग रोड चे काम चार पॅकेज मध्ये केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 136.80 किलोमीटर लांबीच्या 9 पॅकेजच्या कामासाठी 12 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

विशेष बाब अशी की यामध्ये काही परदेशी कंपन्यांचा देखील समावेश आहे. म्हणजेच आपल्या पुण्यातील रिंग रोडची विदेशी कंपन्यांना देखील भुरळ पडली आहे. दरम्यान या 12 कंपन्यांनी सादर केलेल्या तांत्रिक निविदा नुकत्याच उघडल्या गेल्या असून आता या निविदांची छाननी होणार आहे.

येत्या आठवड्याभरात ही छाननी प्रक्रिया पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यानंतर मग पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार असे चित्र आहे. पुणे रिंग रोडच्या कामासाठीची वर्क ऑर्डर लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतरच दिले जाण्याची शक्यता आहे.

पुणे रिंग रोडचे 9 पॅकेजेस कोणकोणती

पूर्व भागातील रिंग रोडचे पॅकेज : पॅकेज 1 अंतर्गत (11.85 किमी): उर्से ते इंदोरी (मावळ तालुका), पॅकेज 2 अंतर्गत (13.80 किमी) : इंदोरी ते चिंबळी (मावळ, खेड), पॅकेज 3 अ आणि ब अंतर्गत (21.20 किमी) : चिंबळी ते सोलू (ता. खेड) आणि सोळू ते लोणीकंद (ता. खेड, मावळ), पॅकेज 4 अंतर्गत (24.50 किमी) : लोणीकंद जवळील वालटी (ता. हवेली)

पश्चिम भागातील रिंग रोडचे पॅकेजेस : पॅकेज 1 (14.65 किमी): उर्से ते केमसेवाडी (ता. मावळ- मुळशी), पॅकेज 2 (20 किमी) : केमसेवाडी ते मोरेवाडी (ता. (मुळशी), पॅकेज 3 (14 किमी) : मोरेवाडी ते वर्दाडे खेमगाव (मावळ, मुळशी, हवेली), पॅकेज 4 (7.50 किमी): वदडि खेमगाव मावळ ते कल्याण रहाटवडे (हवेली) आणि पॅकेज 5 अंतर्गत (9.30 किमी) : कल्याण रहाटवडे ते शिवरे कुसेगाव (हवेली, भोर)

Leave a Comment