मे महिन्यात किती दिवस बंद राहणार बँका ? आरबीआयने दिली सुट्ट्याची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

May Bank Holiday List By RBI : बँक ग्राहकांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण देशभरातील बँकांना मे महिन्यात किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरबीआयने मे महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार याची यादी जाहीर केली आहे.

यामुळे जर मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. खरे तर एप्रिल महिना महिना संपण्यास आता फक्त सात दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान पुढील मे महिन्यात बँकांना तब्बल बारा दिवस सुट्ट्या राहणार आहेत.

यामुळे पुढील महिन्यात जर तुम्हाला बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील तर सुट्टीची यादी पाहूनच तुम्हाला कामाचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान आता आपण मे महिन्यात कोणत्या बारा दिवसांसाठी बँका बंद राहतील याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या तारखेला बँकेला सुट्टी राहणार

आरबीआय कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात अर्थातच मे महिन्यात देशातील बँकांना एकूण १२ दिवस सुट्या राहणार आहेत. परंतु, या सर्व सुट्या देशाच्या सर्वच भागात लागू राहणार नाहीत.

म्हणजे प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या बदलणार आहेत. म्हणजे काही राज्यांमध्ये कमाल बारा दिवस सुट्ट्या राहतील तर काही राज्यांमध्ये त्यापेक्षा कमी सुट्ट्या असतील. राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक, तसेच राज्य सरकारांनी मे २०२४ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्यांसह एकूण १२ सुट्या समाविष्ट आहेत.

1 मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिन ( महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी राहणार आहे.)
5 मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
8 मे : रवींद्रनाथ टागोर जयंती दिनानिमित्त कोलकत्ता येथील बँका बंद राहतील.
10 मे : बसव जयंती, अक्षय तृतीया निमित्त या दिवशी बेंगळुरू येथील बँका बंद राहणार आहेत.
11 मे : महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने या दिवशी संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.
12 मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
16 मे : राज्य दिन असल्याने गंगटोक येथील बँका बंद राहतील.
19 मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहे.
20 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि बेलापूर येथील बँका बंद राहतील.
23 मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने बहुतांशी ठिकाणी बँका बंद राहणार आहे.
25 मे : चौथा शनिवार असल्याने संपूर्ण भारतभर बँकांना सुट्टी राहणार आहे.
26 मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.

Leave a Comment