Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. लोक आपल्या सोयीने आणि गरजेनुसार योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असतात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
दरम्यान जर तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल मात्र कोणत्या योजनेत गुंतवणूक करावे हे तुम्हाला सुचत नसेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एक ठराविक रक्कम गुंतवल्यानंतर गुंतवणूकदाराला दरमहा 9000 रुपये हमखास मिळणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना. या योजनेच्या नावावरूनच समजते की यात गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी एक फिक्स उत्पन्न मिळणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी आहे.
या योजनेत सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट मध्ये नऊ लाख आणि जॉईंट अकाउंट मध्ये कमाल 15 लाख रुपये टाकता येतात.
या योजनेत गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित तर आहेतच शिवाय या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज हे बँकेच्या एफडी पेक्षा अधिक आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या स्थितीला पोस्टाच्या माध्यमातून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.4% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.
आता आपण या योजनेतून प्रति महिना 9000 रुपये मिळवायचे असतील तर किती गुंतवणूक करावी लागणार या विषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
9 हजार रुपये मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जॉईंट अकाउंट ओपन करून जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांना वर्षाकाठी व्याज म्हणून एक लाख 11 हजार रुपये मिळणार आहेत. अर्थातच महिन्याला 9250 रुपये एवढे व्याज मिळणार आहे.
जर समजा तुम्ही यामध्ये सिंगल अकाउंट ओपन केले आणि नऊ लाख रुपयांची अमाऊंट गुंतवली तर तुम्हाला वार्षिक 66,600 व्याज म्हणून मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला 5 हजार 550 रुपये प्रति महिना व्याज मिळणार आहे.