Post Office Scheme : भारत सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी शेकडो बचत योजना राबवल्या जात आहेत. या बचत योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. शिवाय सरकारच्या या बचत योजनेत गुंतवलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित आहे. सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या बहुतांशी बचत योजना पोस्ट विभागामार्फत सुरु आहेत.
दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या काळात एखाद्या सरकारी बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण पोस्ट विभागामार्फत सुरू असलेल्या एका महत्त्वाकांक्षी बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ती बचत योजना महिला सेविंग सन्मान सर्टिफिकेट या नावाने ओळखली जाते. या बचत योजनेत फक्त महिलांनाच गुंतवणूक करता येते. म्हणजेच ही योजना फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील गुंतवणूक केली आहे हे विशेष. यामुळे ज्या महिलांना एखाद्या सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी पोस्टाची ही योजना फायदेशीर ठरणार आहेत. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेणार आहोत.
कशी आहे महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना
महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे. ही एक गव्हर्मेंट सेविंग स्कीम आहे. म्हणजेच यामध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर महिलांना 7.5% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जात आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षे एवढा आहे. या योजनेत किमान 1000 रुपये आणि कमाल दोन लाख रुपयांची रक्कम गुंतवता येते.
म्हणजे एक हजार रुपयांपेक्षा कमी आणि दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम यामध्ये गुंतवता येत नाही. परंतु एक महिला या योजनेअंतर्गत कितीही अकाउंट ओपन करू शकते. मात्र एक अकाउंट मध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवता येतात.
तसेच जर एखाद्याला एकापेक्षा जास्तीचे अकाउंट ओपन करायचे असेल तर एक अकाउंट ओपन केल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरे अकाउंट ओपन करावे लागते. एकाच वेळी एकच अकाउंट ओपन होते.
दोन लाख रुपये गुंतवले तर किती व्याज मिळणार?
जर एखाद्या महिलेने या योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर महिलेला योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच दोन लाख रुपये गुंतवून अवघ्या दोन वर्षात महिला गुंतवणूकदारांना या योजनेतून 32 हजार 44 रुपयांचा परतावा मिळणार आहे.