गुड न्यूज ! भविष्यात मुंबई ते नांदेड प्रवास होणार फक्त 6 तासात ; तयार होणार नवीन महामार्ग, ‘या’ 8 तालुक्यातील 87 गावांमधून जाणार रस्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai To Nanded Expressway : महाराष्ट्रात महामार्गांचे जाळे विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 15 नवीन महामार्ग तयार केले जाणार आहेत. या 15 पैकी एक महामार्गाचे काम म्हणजेच मुंबई ते पुणे महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेला 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग हा सध्याचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.

या महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला होता. 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.

2024 मध्ये अर्थातच या चालू वर्षी भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. एकंदरीत सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे.

विशेष म्हणजे उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा या वर्षा अखेर पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तार देखील होणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत जालना ते नांदेड दरम्यान नवीन समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. हा जवळपास 180 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण होणार आहे.

हा एक सहा पदरी महामार्ग असून या प्रकल्पाचे सहा पॅकेज मध्ये काम केले जाणार आहे. या सहा पॅकेजच्या कामासाठी दहा कंपन्यांनी 23 निविदा सुद्धा दाखल केल्या आहेत. खरे तर अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा महामार्ग व्हावा अशी मागणी केली होती.

हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे. दरम्यान आता या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत असल्याने अशोक चव्हाण यांची स्वप्नपूर्ती झाली असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे अशोक चव्हाण यांनी यावर समाधान देखील व्यक्त केले आहे. या महामार्गामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाची जोड मिळणार आहे. साहजिकच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही जिल्ह्यांमधील नागरिकांना जलद गतीने छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये जाता येणार आहे.

यामुळे मराठवाड्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा एक्सप्रेस – वे जालना येथून सुरू होऊन परभणीपर्यंत जातो तेथून हा मार्ग हिंगोली आणि नंतर नांदेडला जातो.

हा एक्स्प्रेस – वे चार जिल्ह्यांतील एकूण 87 गावातून जाणार आहे. यामुळे या चारही जिल्ह्यातील कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग, रोजगार इत्यादी क्षेत्राला फायदा होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नांदेड येथील नागरिकांना अवघ्या सहा तासात मुंबईला जाता येणार आहे.

सध्या स्थितीला नांदेड ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी 11 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास कालावधी पाच तासांनी कमी होणार आहे.

Leave a Comment