Post Office Scheme : प्रत्येकालाच आपल्या जवळचा पैसा आणखी वाढावा असे वाटते. यासाठी अनेक जण गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म देखील आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड हे देखील असेच लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. येथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना काही वर्षातच चांगला बंपर परतावा मिळतो.
मात्र येथील गुंतवणूक ही खूपच रिस्की असते. येथून चांगला परतावा मिळत असला तरी देखील काही प्रसंगी पैशांचे नुकसान देखील होऊ शकते. यामुळे येथे गुंतवणूक करण्याआधी चांगला अभ्यास करणे आवश्यक असते. यामुळे अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड पेक्षा कमी परतावा मिळत असलेल्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत असतात.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस मधील या बचत योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांमधून गुंतवणूकदाराला चांगले रिटर्न देखील मिळणार आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बचत योजनेची सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम
पोस्ट ऑफिसची ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेली आहे. ही योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहे. कारण की, यामधून एफडी पेक्षा अधिकचे व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तब्बल आठ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दर महिन्याला वीस हजारापर्यंतची कमाई होऊ शकते.
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अर्थातच POSSC मध्ये गुंतवणूक केल्यास 8.2% एवढे विक्रमी व्याज दिले जात आहे. एक जानेवारी 2024 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या योजनेत खाते उघडून तुम्ही किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता.
या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्ती किंवा जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडता येते.
पण, या योजनेत खाते उघडताना VRS घेणाऱ्या व्यक्तीचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असू शकते, तर निवृत्त संरक्षण कर्मचारी 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयात गुंतवणूक करू शकतात, तथापि, त्यासाठी काही अटीही लावण्यात आल्या आहेत.
या योजनेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कर सूट दिली जाते. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम देण्याची तरतूद आहे.
यामध्ये प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी व्याज दिले जाते. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाते आणि त्याची संपूर्ण रक्कम कागदपत्रांमध्ये नोंदवलेल्या नॉमिनीला सुपूर्द केली जाते. मात्र जर मुदत संपण्यापूर्वी या योजनेचे खाते बंद केले गेले तर पेनल्टी द्यावी लागते.
कशी होणार महिन्याला 20 हजाराची कमाई
या योजनेत अधिकाधिक तीस लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. जर समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेत तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 2.46 लाख रुपये मिळणार आहेत. अर्थातच महिन्याला वीस हजारापर्यंतची कमाई अशा व्यक्तीला होऊ शकते.