बातमी कामाची ! तलाठ्याकडून झालेले खातेवाटप रद्द करता येते का ? तुम्हाला हे नियम माहिती आहेत का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property News : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की, आज आपण शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याच्या अशा खाते वाटपाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून खाते वाटपसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळकतीचे खाते वाटप हा एक मोठा गुंतागुंतीचा विषय आहे.

दरम्यान आज आपण खातेवाटपसंदर्भात जाणून न घेता झालेले खातेवाटप रद्द करता येते का या संदर्भात काय नियम आहेत, कायद्यात काय तरतुदी आहेत याविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर अनेकांच्या माध्यमातून तलाठ्याकडून झालेले खातेवाटप रद्द करता येते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण या संदर्भात कायदे तज्ञांनी काय म्हटले आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कायदे तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या मिळकतीचे, जमिनीचे खातेवाटप महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १८५ अन्वये केलेले असेल आणि त्याप्रमाणे ७/१२ च्या उताऱ्यावर वाटपाप्रमाणे मूळ गट नंबरचे पोट हिस्से म्हणजे खातेवाटप प्रमाणे वेगवेगळे गट नंबर झालेले असतील तर अशा प्रकरणांमध्ये तलाठ्याला खातेवाटप रद्द करण्याचा अधिकार राहत नाही.

मग आता जर असे खाते वाटप एखाद्याला मान्य नसेल? तर काय करावे हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान झालेले खाते वाटप देखील रद्द होऊ शकते.

मात्र ते खातेवाटप तलाठी रद्द करू शकत नाही. तर, झालेले खातेवाटप रद्द करण्यासाठी तुम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

जर काही कारणास्तव तुम्हाला खाते वाटप मंजूर नसेल तर तुम्ही यासंदर्भात वरिष्ठ महसूल अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी अर्थातच एसडीओ यांच्याकडे अपील करू शकता किंवा मग दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करू शकता.

तुमचा दावा दाखल झाल्यानंतर मग या प्रकरणात सुनावणी घेतली जाते आणि मग योग्य तो निर्णय दिला जातो. यावरून झालेले खातेवाटप रद्द करण्याचा अधिकार तलाठी यांना नाहीये. मात्र खाते वाटप रद्द करण्यासाठी इतर कायदेशीर मार्गाचा वापर केला जाऊ शकतो.

आई-वडिलांनी मुलगा दत्तक घेतला तर बहिणींना मालमत्तेत हिस्सा मिळतं नाही का ?

अनेकांच्या माध्यमातून जर आई-वडिलांनी मुलगा दत्तक घेतला असेल तर बहिनींचा मालमत्तेतला हिस्सा संपतो का असा प्रश्न उपस्थित केला होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर एखाद्या कुटुंबामध्ये मुली असतील अन वडिलांनी मुलगा दत्तक घेतला असेल तर यामुळे मुलीचा हक्क संपत नाही.

फक्त दत्तक घेतलेल्या मुलामुळे मिळकतीमध्ये एक हिस्सेदार वाढतो. म्हणजेच सदर कुटुंबाच्या मिळकतीत दत्तक मुलाचा हिस्सा वाढतो. अशा प्रकरणात दत्तक मुलासहित साऱ्यांनाच समान हिस्से मिळतात.

Leave a Comment