Property Rights : मालमत्ता विषयक तसेच संपत्ती विषयक अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतात. संपत्तीवरून नेहमीचे मोठमोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. अनेकांना संपत्तीविषयक कायद्याबाबत फारशी माहिती नसते. यामुळे वाद-विवाद होतात.

अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांच्या अर्थातच 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या नावे असलेली संपत्तीची खरेदी विक्री करता येते का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कायद्याने अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमीन मालमत्ता खरेदी-विक्री करता येते का याविषयी कायद्यात काय तरतूद आहे याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय सांगतो कायदा ?

Advertisement

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमिनी खरेदी विक्री करता येत नाही. असे करणे कायद्याने गुन्हा समजला जातो.

जर समजा अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमिनी खरेदी विक्री करायची असेल तर अशा परिस्थितीत माननीय न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते.

Advertisement

तथापि, याला काही अपवाद देखील आहेत. जर समजा काही कारणास्तव घर, जमीन अशा संपत्तीची विक्री करायची असेल आणि त्या जमिनीच्या उताऱ्यावर अल्पवयीन मुलांची नावे असतील तर माननीय न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

तसेच विक्री केलेल्या मालमत्तेतून काही रक्कम सदर अल्पवयीन मुलांच्या नावावर ठेवावी लागणार आहे. मात्र, जर एखाद्या प्रकरणात मालमत्ता विक्री करायची आहे त्यावर विक्रेत्याचे आणि अल्पवयीन मुलांचे नाव असेल तर अशा प्रकरणांमध्ये विक्रेत्याला न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज राहत नाही.

Advertisement

कारण की, अशा प्रकरणांमध्ये विक्रेता हा मालकच असतो. याशिवाय, स्वतः खरेदी केलेली आणि अल्पवयीन मुलांच्या नावे असणारी मालमत्ता विकायची असल्यास न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती जाणकार लोकांनी यावेळी दिली आहे.

तसेच, अल्पवयीन मुलाचा सांभाळ करणारे नातेवाईक यांना जर जमीन-जागा किंवा इतर मालमत्ता विकायची असेल तर त्यांना देखील माननीय न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार असे कायद्यात म्हटले गेले आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *